आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा||१||
तुजभवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा?
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा ||२||
घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा कैसा उंबरा?
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा
तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी, डोंगर, हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा ||३||
कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा?
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा ||४||
गीतकार : जगदीश खेबुडकर
Hello my family member! I wish to say that this article is awesome,
great written and come with almost all vital infos. I would like to see extra posts like this .